बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील संशयीत आरोपी असलेले वाल्मिक कराड हा अखेर पुणे सीआयडीसमोर शरण आले आहेत. पुणे पोलिस त्यांची कसून चौकशी करत असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. तब्ब्ल २२ दिवसांनी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
/Beed Valmik Karad Surrender : अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप सातत्याने होत आहेत. वाल्मिक कराड हा आज शरण आला आहे याबाबत प्रश्न विचारला असता, ‘संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी माझं फोनवर बोलणं झालं आहे. या घटनेत जे दोषी असतील त्या कोणालाच सोडणार नाही. प्रत्येक दोषींवर कारवाई करणार. जाणीवपूर्वक हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. ज्यांचा -ज्यांचा या घटनेत सहभाग आहे, त्या प्रत्येकावर कारवाई होणार. आम्ही कोणालाही सोडणार नाही, मात्र ज्यांना यामध्ये राजकारण महत्त्वाचं वाटत त्यांना ते लखलाभ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.