बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड याच्या अटकेसाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांची निघृण हत्या करण्यात आली. वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत असा आरोप गावकऱ्यांकडून होताना दिसत आहे. वाल्मिक कराड यांच्या कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात आली.वाल्मिक कराड याला अटक करण्यासाठी सीआयडीची ४ पथक रवाना देखील करण्यात आले होते. मात्र बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड स्वत: सीआयडीला शरण आला आहे. पुण्यातील सीआयडीसमोर त्याने शरणागती पत्कारली आहे.तत्पूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर केला.
Manoj Jarange Patil: ‘आरोपीला अटक केली नाही तर..’ मनोज जरांगे पाटलांचा इशारा
वाल्मिक कराड याने एक व्हिडिओ शेअर करत मोठा दावा केला आहे. ‘मी वाल्मिक कराड. केज पोलिस स्थानकात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. त्यात मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी पुण्यातील सीआयडी ऑफिस येथे शरण येत आहे.’असं म्हणत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. तर, ‘संतोष भय्या देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी मारेकरी असतील त्याला अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी’ अशी मागणी देखील केली आहे. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलं आहे.