3 C
New York

Manoj Jarange Patil: ‘आरोपीला अटक केली नाही तर..’ मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Published:

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन पैलू समोर येताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपीला चांगलीच शिक्षा व्हावी अशा मागणीचे सूर सध्या सगळीकडू उमटताना दिसत आहेत. अशातच आज सरंपच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीमध्ये अनेक तास चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याभेटीनंतर ‘आरोपीला शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय द्या.’अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. तर ‘आरोपीला अटक केली नाही तर सगळं राज्य ढवळून काढू.’असं विधान करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेवटी काय असतं बघा, झालेला आघात, झालेलं दु:ख हे सहन होण्यापलीकडच आहे. शेवटी ज्याला त्यालाच कळतं. आपल्या भावाचा जीव गेल्यावर वेदना काय असतात, ते दु:ख वेदना शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यांचं कुठे मन लागत नाहीय, या जगात भाऊ दिसत नाही”असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी धनंजय देशमुख यांचं सांत्वन केलं.

Beed Case Update : मोठी बातमी…वाल्मिक कराड महाराष्ट्रातच ?

‘शेवटी न्याय द्यायला सरकार उशीर करतय. आरोपी सापडायला 25-30 दिवस लागतायत, शेवटी घालमेल आहे. एवढा दु:खाचा डोगंर कोसळलाय. घालमेल प्रचंड आहे. त्या कुटुंबाला जीवन असूनही सुद्धा नसल्यासारख झालेलं आहे. हा आघात सगळ्या मराठा समाजावर, राज्यातल्या जनतेवर झालाय, कारण इतकी क्रूर हत्या आतापर्यंत झालेली नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, ते मी ऐकून घेणार आहे. माझ्या समाजाला त्यांच्या भावना सांगणार आहे. संतोष भय्याला न्याय देण्याची क्षमता या समाजात आहे. कुटुंबाला समाजाच्या आधाराची गरज आहे. समाजाने त्यांना आधार द्यावा. सरकार जनता आहे. आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आपला मराठा समाज सक्षम आहे. तुम्ही काळीज करु नका”असं ही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img