3.7 C
New York

Maharashtra Weather : नववर्षात राज्यातील तपमानात होणार मोठे बदल

Published:

राज्यातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे तपमान (Maharashtra Weather)गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. थंडी काही जिल्ह्यांमध्ये, तर बाकी काही जिल्ह्यांमध्ये दमट हवामान तर ढगाळ वातावरण काही जिल्ह्यांमध्ये असून अवकाळी पावसाला यामुळे पोषक स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पण अनेक ठिकाणी अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचेही पाहायला मिळाले. मात्र, आता चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तर प्रदेश आणि परिसरात आहे, त्यामुळे उत्तरेकडील राज्यात दाट धुकं आणि थंडीची लाट आहे. मात्र, यामुळे राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार असून यामुळे तपमानात मोठे बदल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (Maharashtra Weather There will be big changes in temperature in state in new year)

राज्यात पुन्हा किमान तापमानात येत्या चार ते पाच दिवसांमध्ये घटणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार2-4 अंश सेल्सियसने तापमान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात घसरणार आहे. येत्या 24 तासांमध्ये विदर्भातील पारा 4 ते 5 अंशाने हळूहळू घसरणार आहे. विदर्भात कमाल तापमानात येत्या पाच दिवसात फारसा परिणाम जाणवणार नाही. येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले आहे. तर, येत्या चार ते पाच दिवसात मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. तपमानात बदल होत असल्याने याचा नागरिकांचा आरोग्यावरही परिणाम पाहायला मिळू शकतो, ज्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, हवामान विभागाकडून गुलाबी थंडीने नवीन वर्षाची सुरुवात ही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब हरियाणा भागात थंडीची लाट राहणार असून राज्यात कोरडे हवामान राहणार आहे, अशी माहिती सुद्धा हवामान विभागकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img