मुंबईतून मोठी बातमी समोर आलीय. शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Accident) यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. ही घटना रविवारी मध्यरात्री घडल्याची घटना समोर आलीय. हा अपघात (मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ Ravindra Waikar News) झालाय. या अपघातप्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांनी वनराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलीय. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत, परिसरातील सीसीटीव्ही तपासला जातोय.
रविवारी मध्यरात्री उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदारांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी खासदार रवींद्र वाईकर देखील गाडीत असल्याची माहिती समोर (Maharashtra Politics) आलीय. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ मध्यरात्री हा अपघात झालाय. आयशेर टेम्पोने वायकरांच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये कोणती जीवितहानी झालीय का, याची माहिती अजून समोर आली नाही.
अपघात घडल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातप्रकरणी अधिक चौकशी केली जातेय. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरीचा सीआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर ही दुर्घटना झालेली आहे. एका टेम्पोची वायकरांच्या गाडीला जोरदार धडक बसली. परंतु या अपघातात खासदार रवींद्र वायकर बचावले आहेत.