3.7 C
New York

Mahayuti Minister : ‘या’ १७ मंत्र्यांनी अद्यापही स्विकारला नाही ‘पदभार’;नाराजीचा सूर कायम !

Published:

विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेली महायूतीतील धूसफूस अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली, तरी अजूनही तब्बल १७ मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे महायूतीतील वाद अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आता मंत्री नव्या वर्षामध्येच पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे.

नागपूर अधिवेशनात फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनी शपथ घेतली, पण 18 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. यातील अनेक मंत्र्यांना मनाप्रमाणे मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यांची नाराजी संपल्यानंतरच ते पदभार स्वीकारतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 2024 चे फक्त दोनच दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महायुती सरकारच्या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. या मंत्र्यांमध्ये आशिष शेलार, अतुल सावे, नरहरी झिरवाळ, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, योगेश कदम, पंकज भोयर, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल आणि मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत गोंधळ सुरूच आहे. निवडणूक निकालानंतर सुरुवातीला मुख्यमंत्रिपदाबाबत बराच काळ सस्पेंस होता. यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील विजयानंतरही मंत्रिमंडळ विस्तारासाठी 16 दिवस लागले. या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांना सावधगिरी बाळगावी लागली. दरम्यान, अजित दादा व शिंदे गटामध्येही नाराजी दिसून आली. आता ते प्रकरण शांत झाले असले तरी मुंबई शहर, उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, संभाजीनगर, बीड,ठाणे, कोल्हापूर या शहरांच्या पालकमंत्रीपदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे. यावरून काही जिल्ह्यांत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे.

Ravindra Waikar : शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीचा भीषण अपघात, मद्यधुंद ट्रक चालकाची धडक

महाराष्ट्रातील रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे. बीडमध्ये भाऊ-बहीण पंकजा आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img