3.7 C
New York

Beed Case : वाल्मीक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी, अजितदादांच्या अडचणी वाढणार?

Published:

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारमधील काही नेते आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यावी. तसंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी करत सर्वपक्षीय नेत्यांनी मुक मोर्चा काढला. याप्रकरणी आतापर्यंत वाल्मिक कराडांच्या पत्नी मंजिली कराड, कराडांचे 2 बॉडीगार्ड, अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षांची सीआयडीने चौकशी केली आहे. तर मंजली कराड यांची आज पुन्हा चौकशी करण्यात आली. यामध्ये काल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. यामुळे अजित दादांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

सीआयडीकडून संध्या सोनावणे यांच्यासह अन्य तीन जणांची चौकशी काल गेली गेली. रविवारी आठ तासांपेक्षा अधिक काळ चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर संध्या सोनावणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की राजकारणात असल्याने सर्वांशी संबंध येत असतात. पण वरिष्ठांवर होत असलेल्या आरोपांबाबत मी आता भाष्य करणार नाही. जेव्हा जेव्हा पोलीस बोलावतील त्यावेळी मी चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड यांच्यावर संशयाची सुई आहे. त्यांच्यावर बीड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून कराड सध्या फरार आहे. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. खंडणी प्रकरणी सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नीसह त्यांच्या 2 बॉडीगार्डची चौकशी केली. तर रविवारी पुन्हा मंजली कराड यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तर यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि युवती प्रदेशाध्यक्षांचीही चौकशी करण्यात आल्याने आता अजित दादांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार आरोपींना अटक व्हावी, यासाठी जनतेतून पोलिसांवर दबाव आहे. त्यातच, विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून काँग्रेस, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते मंत्री धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याची आणि वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ह्या प्रकरणात देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये तळ ठोकला आहे. पोलिसांना तपासात मदत करताना सत्ताधाऱ्यांवर बीडच्या मंत्रीमहोदयांवर त्यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. तसेच, वाल्मिक कराडच्या अटकेची मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून अद्यापही हत्याप्रकरणातील 3 आरोपी व खंडणीप्रकरणातील वाल्मिक कराडचा शोध घेतलेला नाही. अखेर, सीआयडीच्या तपासाचा वेग, पोलिस यंत्रणा व सरकारवर वाढत असलेला राजकीय, सामाजिक दबाव लक्षात घेत आता वाल्मिक कराड शरण येत असल्याची माहिती आहे.

वाल्मिक कराड पोलिसांना येत्या एक ते दोन दिवसात शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, आता वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्यात पोलिसांकडून अटक केली जाते हे पाहावे लागेल. कारण, खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आरोपी असून अद्याप खूनप्रकरणात त्यास आरोपी करण्यात आले नाही. त्यामुळे, आमदार जितेंद्र आव्हाड व अंजली दमानियांकडून खूनप्रकरणातही वाल्मिक कराडला गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केली आहे. पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असून उर्वरीत तीन फरार आरोपींना देखील अटक कधी होणार, हाही प्रश्न अनुत्तरीत आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास काही दिवसांपूर्वी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. आता सीआयडीच्या तपासातील जवळपास 5 मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. यामध्ये अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवर आरोपींचे ठसे जुळले आहेत. याशिवाय आरोपींचे बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. याबाबतची माहिती सूत्रांनी दिलीये.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img