महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये अनेक जुन्या नेत्यांना स्थान मिळालेले नाही. दरम्यान, भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक दिवस आधी शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या यादीत आपले नाव असल्याचा दावा केला होता, मात्र नंतर यादी जाहीर झाली. यामध्ये मात्र सुधीर मुनगंटीवारांचे (Sudhir Mungantiwar) नाव नव्हते. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विस्तारित मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
चंद्रपूरमध्ये बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ज्यांना वाटतं मी मंत्री झालो नाही. त्यांच्यासाठी आजची घटना. मी सकाळी नागपूरच्या विमानात बसलो. परंतु अचानक काय झालं की, नागपूरला मी आणि विमान दोन्ही उतरू शकलो (Maharashtra Politics) नाही. कारण नागपूरात मोठ्या प्रमाणात धुकं जमा झालं होतं. म्हणून ते विमान पायलट थेट हैद्राबादला घेवून गेला. आमचं विमान हैद्राबाद उतरलं. मग एक तासाने जेव्हा संदेश आला की, नागपूरचं धूकं सपलं तेव्हा विमान पुन्हा नागपूरला आलं.
जीवनाचं असंच असतं, काही क्षण धुकं येतं पण ते परमानंट नसतं. पुन्हा आपलं विमान उतरणार हे निश्चित असतं असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. आपल्या प्रेमाने मंचावर बसलेले जे कार्यकर्ते आहेत, ते इतकं प्रेम करतात की या प्रेमासमोर ते पद निश्चितपणे छोटं आहे, असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. आपण नाराज नसल्याची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केलीय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना बीड पोलिसांची नोटीस; नेमकं काय घडलं?
यापूर्वी बोलताना देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज असण्याचं कारण नाहीये. पक्षाने दिलेल्या आदेशाचं आणि जबाबदाऱ्यांचं पालन मी आजवर करत आलोय. विधिमंडळाचे जास्त काम नसल्यामुळे गैरबजर होतेो. मी नाराज नाही. मागील 15 वर्षे आम्ही विरोधात होतं. मला देण्यात आलेली जबाबदारी मी आतापर्यंत निष्ठेने पार पाडली पुढे देखील ती पार पाडेन, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.
मी नेहमीच जीव ओतून काम केलंय अन् पक्षाने देखील काम प्रेम दिलंय. शपथविधी होण्यापू्र्वी मंत्रीपद देण्यात येणार, असं मला सांगण्यात आलं होतं. परंतु कदाचित माझ्यावर नवी जबाबदारी सोपविण्यात येणार असेल म्हणून मंत्रिपद दिलं नसावं, असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.