7.8 C
New York

Heavy Rain : महाराष्ट्रात पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

Published:

मुंबईसह मागील काही दिवसांपासून राज्यभरातील (Heavy Rain) वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. डिसेंबर हा थंडीचा महिना सध्या सुरू असला तरी, मुंबईतील हवा वातावरणातील बदलांमुळे प्रदूषित झाली असून, थंडी गायब झाली आहे. हवामान विभागाकडून एकिकडे प्रदूषित वातावरण तर, दुसरीकडे आता पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार, वादळी वाऱ्यासह, विजांसह पावसाची शक्यता 28 डिसेंबर रोजी हवामान खात्याने दिला आहे. तसेच ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला असून दक्षतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पावसाच्या हलक्या सरी सद्यस्थितीत राज्यातील 11 जिल्ह्यांत कोसळत आहेत. शिवाय, 12 ते 13 जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच,पुढील काही दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये 29 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या बदलत असलेल्या वातावरणाचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळत आहे. पावसाची शक्यता त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये राहणार आहे. गारपीटीसह पावसाचा इशारा या परिसरात देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातली काही तुरळक ठिकाणी शिवाय, रविवारी राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहणार आहे.

पावसाने राज्यातील नाशिक जिल्ह्यात सुद्धा हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. निफाड, पिंपळगाव भागात दमदार पाऊस झाला असून, मनमाड शहर परिसरासह येवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. परिणामी हिवाळ्यात झालेल्या या अवकाळी पावसाचा फटका रब्बीच्या हंगामातील सर्वच पिकांना बसण्याची भीती द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे.या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img