7.7 C
New York

Beed Muk Morcha : मूक मोर्च्यात सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल

Published:

बीड येथील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा (Beed Muk Morcha) आयोजित करण्यात आला होता. या मोर्च्यात मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासह भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार संदीप क्षिरसागर (Sandeep Kshirsagar) , जितेंद्र आव्हाडसह (Jitendra Awhad) अनेक नेते उपस्थित होते. या मोर्च्यात बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार फटकेबाजी करत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. ही पद्धत चुकीची आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार कोणालाही मुंगी मारण्याची परवानगी नाही. संतोष देशमुख तीन टर्मचा सरपंच होता. दोनदा जनतेतून निवडणून आला आणि एक वेळा बॉडीतुन निवडणून आला होता. असं सुरेश धस म्हणाले.

पुढे बोलताना आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले की, मी 80 हजार मतांनी निवडणून आले मात्र धनु भाऊ तुम्ही 1 लाख 42 हजार मतांनी निवडणून आले 330 बुथांपैकी 230 बुथा ताब्यात असतील तर हेच होणार. तुम्ही बोगस मतांनी जिंकून आले आहे असा आरोप देखील यावेळी बोलताना सुरेश धस यांनी केला.

अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल, जरागेंचा CM फडणवीसांना रोखठोक इशारा

गोली मार भेजे में, भेजा जो करता हें असं गाणं सत्या पिक्चरमध्ये आहे. मात्र बीड जिल्ह्यात गोली मार किधर भी हो गया. जिल्ह्यात 1200-1300 लायसन्स ज्या जिल्ह्याधिकारींनी दिले आणि ज्या पोलीस अधीक्षकांनी त्याला समर्थन दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असेही आमदार सुरेश धस म्हणाले. तसेच या प्रकरणातील मुख्य आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. अशा मागणी देखील त्यांनी केली.

तर पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत सुरेश धस म्हणाले की, पंकूताई माझा सवाल आहे. तुम्ही संभाजीनगर एअरपोर्टला उतरला. 12 डिसेंबर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा दिवस आहे मात्र तुम्ही वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का नाही गेला? असा सवाल आहे माझा असं सुरेश धस म्हणाले. तसेच पंकजा मुंडे तुम्हाला चांगली माणसं कळत नाहीत. तुम्हाला फक्त जी हुजूर जी हुजूर करणारी माणसं पाहिजेत. असा टोला देखील त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना लावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img