7.7 C
New York

Sambhaji Raje : धनुभाऊंचे सगळे पत्ते बाहेर काढत संभाजीराजेंचा थेट इशारा

Published:

धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, असे मी म्हटले होते. आता त्यांचा राजीनामा घेतील की नाही, हकालपट्टी करतील की नाही हे मला माहीत नाही. परंतु धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पालकमंत्रीपद देऊ नका. त्यांना बीडचे पालकमंत्री पद दिले तर बीडचे पालकत्व मी घेणार आहे, अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी केला. यावेळी घडलेल्या संपूर्ण प्रकरणाचा जो म्होरक्या आहे. त्याचा नेता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतो असे थेट विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते बीडमध्ये आयोजित सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये बोलत होते.

Sambhaji Raje मी मंत्रिपद देऊ नका म्हणून सांगितले होते पण…

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय देणाऱ्यांना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका अशी मागणी मी केली होती. पण त्यानंतरही मुंडेंना मंत्रिपद मिळाले. आता ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या बघाता त्यांचा राजीनामा घेतील की नाही, हकालपट्टी करतील की नाही हे मला माहीत नाही. पण धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नका. त्यांना बीडचे पालकमंत्री पद दिले तर बीडचे पालकत्व मी घेणार असल्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केले.

मूक मोर्च्यात सुरेश धसांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल

Sambhaji Raje आम्हाला दहशत चालत नाही

उपस्थितांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, बीडचा बिहार करायचा का? असा सवाल करत आम्हाला दहशत चालत नाही. कुणी दहशत करत असेल तर, मी या ठिकाणी येणार असून, हा महाराष्ट्र आपला असून, बीडचा बिहार करायचा नसेल तर, आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसल्याचे यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img