7.7 C
New York

Otur : पिकअप व दुचाकीची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार 

Published:

ओतूर, प्रतिनिधी: दि.२८ डिसेंबर ( रमेश तांबे )


पिकअप आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदरची घटना शुक्रवारी दि.२७ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील उदापूर ( ता.जुन्नर ) गावाजवळ घडली. धोंडिभाऊ शांताराम ठोंगिरे वय.२८ रा.मुथाळणे ता.जुन्नर जि.पुणे असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.  ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे हे अधिक माहिती देताना म्हणाले की,

अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर ओतूरकडून कल्याण बाजुकडे जाणारी दुचाकी ( एम एच १४ एच टी ६६३२) व कल्याण बाजुकडून ओतूर बाजुकडे येत असलेली महिंन्द्रा  पिकअप (एम एच १७ सी व्ही २४६६) यांची उदापूर गावाजवळ समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार धोंडिभाऊ ठोंगिरे जागीच ठार झाला.

हा अपघात घडल्यानंतर पिकअप चालक पिकअप घेऊन फरार झाला दरम्यान ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळशिराम भवारी,सुरेश गेनजे,शामसुंदर जायभाये, संदीप भोते, वार्डन गोरक्षनाथ भवारी,मडके यांनी पाठलाग करून ओतूर जवळ पिकअप वाहनाला पकडले.

पिकअप चालक प्रविण सुरेश गायकवाड रा.गावठाण,पिंपरी लोकई,ता.राहता,जि.अहिल्यानगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

अपघात ग्रस्त ठिकाणी ओतूर पोलिसांनी जाऊन वाहतूक सुरळीत केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img