बीडमध्ये वाल्मिक कराड याच्याकडून होणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची माहिती देताना भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंधाना यांचं नाव घेतलं होतं. धस यांच्या विधानानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणावर आपण पत्रका परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले असून, धस यांच्या विधानानंतर मनसे नेते अमेय खोपकर हे कलाक्षेत्रातील अभिनेत्रींसाठी ढाल बनून मैदानात उतरले आहेत. याबाबत खोपकर यांनी एक्सवर एक पोस्ट करत धस यांना धारेवर धरले आहे.
Suresh Dhas खोपकर यांची पोस्ट काय?
“सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत”, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Suresh Dhas परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे
आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे. परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या धंद्यांच्या जोरावर प्रचंड पैसा मिळवला जात आणि त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते.
यासाठी सपना चौधरी (Sapna Chaudhary) , रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) , प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांना इथे आणले जाते असे धस म्हणाले. तसेच जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा.जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल असं धस म्हणाले. तसेच प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात असं देखील आमदार सुरेश धस म्हणाले.