7.8 C
New York

Suresh Dhas : धसांचं विधान अन् प्राजक्ता माळीचं नाव; तक्रारीच्या चर्चांमध्ये चाकणकरांनी दिली मोठी अपडेट

Published:

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये बोलताना कालाक्षेक्षातील काही अभिनेत्रींची नावे घेतली. यात मराठी क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिच्या नावाचाही उल्लेख धस यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर वातावरण चांगलेच तापलेले असतानाच धस यांनी आपण कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एक शब्दही बोललेलो नसल्याचे म्हटले आहे. तसेच प्राजक्ता माळी यांनी माझा बाईट पुन्हा ऐकवा असेही सुरेश धस (Suresh Dhas) यांनी म्हटले आहे. (Suresh Dhas Rupali Chakankar On Prajakta Mali)

Suresh Dhas प्राजक्ता माळींनी माझं वक्तव्य पुन्हा ऐकावं अन् मग…

एका वृत्तवाहिनीशी बोलताना धस म्हणाले की, प्राजक्ता माळींची मी प्राजक्ताताई असा उल्लेख केला आहे. एवढेच नव्हे तर, कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एकशब्दही मी बोललेलो नसून, माझा बाईट प्राजक्ता माळी यांनी पुन्हा ऐकाव व त्यात जर काही अवमानकारक वाटलं तर त्यांनी त्यानंतर महिला आयोगाकडे जावं असे धस म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे याउपरही प्राजक्ताताईंनी ठरवल तर माझी काही अडचण नसल्याचेही धस यांनी स्पष्ट केले.

प्राजक्ता माळीकडून अद्याप कोणतीही तक्रार नाही – चाकणकर

धस यांच्या विधानानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विचारण्या आले असता त्या म्हणाल्या की, धस यांच्या विधानानंतर अद्याप प्राजक्ता माळी यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाहीये किंवा काल माझ्या जनतादरबारतही याबाबत संध्याकाळपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नव्हती त्यामुळे याबाबत आयोगाशी काही संपर्क नाहीये किंवा तक्रारीचा मेल किंवा पत्र आले आहे याची कार्यालयात चौकशी करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

दीड लाख तंबू, 1249 किमी पाइपलाइन.. ‘यूपी’तील कुंभमेळ्याचं मेगा नियोजन

Suresh Dhas परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे

आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे. परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या धंद्यांच्या जोरावर प्रचंड पैसा मिळवला जात आणि त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते.

यासाठी सपना चौधरी (Sapna Chaudhary) , रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) , प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांना इथे आणले जाते असे धस म्हणाले. तसेच जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा.जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल असं धस म्हणाले. तसेच प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात असं देखील आमदार सुरेश धस म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img