7.8 C
New York

Anti Terrorism Squad : मोठी कारवाई! नवी मुंबई, ठाणे, सोलापुरातून 13 बांग्लादेशी घुसखोर पकडले

Published:

देशभरात बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा पु्न्हा चर्चेत आला आहे. (Anti Terrorism Squad) नुकत्याच झालेल्या झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या घुसखोरांना पकडून त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवून असे आश्वासन भाजपने दिले होते. या घडामोडी पाहता महाराष्ट्रात या घुसखोरांविरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे.

काल राज्यात काही ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी करून 13 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. हे घुसखोर बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र एटीएसने ही धाडसी कारवाई केली. दरम्यान, महाराष्ट्रात त्यातही मुंबई आणि अन्य मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. त्यामुळे हजारो किलोमीटरचे अंतर पार करून बांग्लादेशी लोक महाराष्ट्रात घुसखोरी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे, नवी मुंबई आणि सोलापुरात छापे टाकले. या छाप्यात पथकाने 13 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये सात पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. या सर्व घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात प्रवेश मिळवला होता. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या घुसखोरांविरुद्ध विदेशी नागरिक कायदा 1946, पासपोर्ट कायदा 1950 आणि पासपोर्ट कायदा 1967 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img