1.5 C
New York

Bajrang Sonawane : “अजितदादा बीडचं पालकत्व घ्या म्हणजे अंधारात..”, बजरंग सोनवणेंनी काय सांगितलं?

Published:

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच यांच्या हत्येनं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या खूनातील मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारवर हल्लाबोल केला होता. यानंतर आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनीही महत्वाचं विधान केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून काहीच फरक पडणार नाही. बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.

बजरंग सोनवणे पुढे म्हणाले, संतोष देशमुखांच्य मारेकऱ्यांना पकडण्याचं आश्वासन पोलिसांकडून दिलं जातं. पण प्रत्यक्षात काहीच कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्‍यांनी अधिवेशनात सांगितलं होतं की आरोपींना शिक्षा करू. परंतु, अद्याप तसं काहीच होताना दिसत नाही. घटनेचा तपास काही पुढे सरकत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय मिळवून द्यायचा असेल तर या हत्याकांडातील मास्टरमाइंडला शोधलं पाहिजे. खंडणीच्या प्रकरणात ज्यांचं नाव आलं आहे त्यांचा यात काही संबंध आहे का हे देखील तपासून पाहिलं पाहिजे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर त्यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरही भाष्य केलं. याआधीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असा थेट आरोप सोनवणे यांनी केला. येथे अंधारात कोण काय काय करतंय हे जाणून घ्यायचं असेल तर आता अजितदादांनीच बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.

चीन ब्रह्मपुत्र नदीवर बांधतोय धरण; भारत-बांग्लादेशला धोका

सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात की विष्णू चाटेने आत्मसमर्पण केलं. पण खरंच त्यांनी आत्मसमर्पण केलं की त्यांना अटक करण्यात आली याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण आहे? त्याचा शोध कधी घेणार? संतोष देशमुख यांची हत्या होऊन अठरा दिवस उलटून गेले तरी देखील तिघे आरोपी अजून फरार कसे आहेत असे सवाल खासदार सोनवणे यांनी उपस्थित केले.

Bajrang Sonawane शनिवारी मूक मोर्चाचे आयोजन

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या (Sarpanch Santosh Deshmukh Murder) हत्येमुळे संतापाचं वातावरण आहे. या हत्या प्रकरणाला 18 दिवस झालेत. परंतु अजून देखील याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. केवळ गंभीर आरोप होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img