1.5 C
New York

Rohit Pawar : ‘कोहिनूर हिऱ्यांना तू चोरून घेऊन चाललास…’रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Published:

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह (Dr.Manmohan Singh) यांचे वयाच्या ९२व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत सलग १० वर्षे पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक काळ हे पद भूषवणारे भारताचे चौथे पंतप्रधान बनले. गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भावनिक शब्दात शोक व्यक्त करत २०२४ वर्षावर नाराजी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार(Rohit pawar) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि दिवंगत उद्योजक रतन टाटा यांचा फोटो पोस्ट करत,’हे#2024 वर्षा,तुला आम्ही कधीही माफ करणार नाहीत.. कारण जाताना तू एकटा जात नाहीस तर आमच्या भारताचे महान रत्न तू चोरून घेऊन चाललास! आमच्या याच रत्नांनी खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला झळाळी दिली, अर्थव्यवस्थेला दिशा दिली, व्यवसायाला सामाजिक जाणीवेची झालर दिली.या दोघांनाही भारतवर्षातील प्रत्येकाने आपल्या हृदयात आदराचं आणि सन्मानाचं स्थान दिलं, त्यांच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव केला, देशप्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून आम्ही त्यांचं नाव अभिमानाने ओठावर मिरवलं.

Manmohan Singh : मनमोहन सिंह यांचा एक कॉल अन् उपोषण थांबलं.. विरोधी नेत्याचा आठवणींना उजाळा

प्रसिद्धीपासून दूर राहून ते फक्त काम करत राहिले. त्यांच्या प्रत्येक श्वासात केवळ देश आणि देशहित होतं. ते इतके मोठे होते की देश त्यांचं योगदान कधीही विसरणार नाही.. अशा आमच्या कोहिनूर हिऱ्यांना तू चोरून घेऊन चाललास..म्हणून 2024 वर्षा तुला आम्ही कदापि माफ करणार नाही..अशी भावनिक पोस्ट शेअर करत २०२४ या वर्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img