4.5 C
New York

Manmohan Singh : अर्थमंत्री पद मिळालं पण मनमोहन सिंहांना खरं वाटलंच नाही.. जाणून घ्या

Published:

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं काल निधन झालं. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत देशाची आगामी काळातील वाटचाल निश्चित करणारे निर्णय त्यांनी घेतले. खरंतर शांत आणि संयमी स्वभावाचे नेते राजकारणात विरळचं. त्यातीलच एक डॉ. मनमोहन सिंह. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा तर उमटवलाच शिवाय पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

परंतु, मनमोहन सिंह यांचा राजकारणात पदार्पणाचा प्रसंगही अनोखा असाच आहे. देशाचे तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांनी डॉ. सिंह यांना अर्थमंत्री बनण्याचा प्रस्ताव रात्री झोपेतून उठवून दिला होता. या प्रस्तावावर त्यांचाही विश्वास बसला नव्हता. सकाळी डॉ. सिंह नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात गेले. पण त्यांना शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात जायचं होतं. या प्रसंगाचा उल्लेख एके भट्टाचार्य यांच्या India’s Finance Ministers : Stumbling into Reforms (1977 to 1998) या पु्स्तकात मिळतो.

Manmohan Singh असं मिळालं यूजीसीचं अध्यक्षपद..

सन 1990 मध्ये मनमोहन सिंह साउथ कमिशनचे सचिव म्हणून काम पूर्ण करून भारतात आले होते. त्यांनी व्हीपी सिंह सरकारच्या टॉप इकॉनॉमिक पॉलिसी टीमचा सदस्य होण्याची इच्छा होती. पंतप्रधानांनी त्यांना आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष होण्यास सांगितलं. मनमोहन सिंह यांनी हे पद स्वीकारणार त्याआधीच व्हीपी सिंह यांचं सरकार पडलं. यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचं सरकार अस्तित्वात आलं. चंद्रशेखर यांनी त्यांना पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागाराचं पद दिलं. 1991 मध्ये चंद्रशेखर याचंही सरकार कोसळलं. या काळात यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. या जागी डॉ. मनमोहन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.

रोजगार गॅरंटी अन् स्किल डेव्हलपमेंट.. अर्थव्यवस्थेला बूस्ट देणारे डॉक्टर ‘मनमोहन’

Manmohan Singh झोपतून उठवून दिली ऑफर

चंद्रशेखर यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळल्यानंतर नरसिंह राव पंतप्रधान झाले होते. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण स्थितीत होती. या काळात अर्थमंत्री कोण व्हावं अशी चर्चा सुरू झाली होती. सुरुवातील रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर आयजी पटेल यांच्याच नावाची चर्चा सुरू होती. परंतु, पटेल यांनी हे पद काही घेतलं नाही. यानंतर मनमोहन सिंह यांचं नाव चर्चेत आलं.

शपथविधी समारोहाच्या एक दिवस आधी पीएम राव यांनी पीसी अलेक्झांडर यांना मनमोहन सिंह यांच्याशी संपर्क करण्याची जबाबदारी दिली. परंतु, हा निर्णय घेताना रात्र झाली होती आणि 20 जून 1991 रोजी नेदरलँड येथून परतलेले डॉ. सिंह झोपलेले होते. अलेक्झांडर यांनी फोन केला. तत्काळ भेटायचं असल्याचं सांगितलं.

यानंतर अलेक्झांडर थेट मनमोहन यांच्या घरी दाखल झाले आणि राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री व्हा असा प्रस्ताव त्यांना दिला. यावर मनमोहन सिंह यांचा विश्वास बसला नाही. त्यामुळे डॉ. सिंह यांनी सकाळी नेहमीप्रमाणे यूजीसी कार्यालय गाठले. तिकडे राष्ट्रपती भवनात त्यांची वाट पाहिली जात होती. परंतु, ते आलेच नसल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यांना पुन्हा फोन करून विचारण्यात आलं की अर्थमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी तयार आहात का.

तरीदेखील सिंह यांना विश्वास होईना. त्यांना सांगण्यात आलं की घरी जाऊन तयार होऊन शपथ घेण्यासाठी या. समारोहात सिंह यांना वित्त मंत्रालयाचं पद दिले गेलं नाही. शपथ समारोहानंतर त्यांना अर्थमंत्री म्हणून नॉर्थ ब्लॉक कार्यालयातून काम करण्यास सांगण्यात आले. नंतर निवेदन प्रसिद्ध करून डॉ. मनमोहन सिंह यांना अधिकृतपणे वित्त मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img