4.5 C
New York

Beed Crime : धनंजय मु्ंडेंच्या कार्यकर्त्याने खुलेआम केला हवेत गोळीबार, अंजली दमानियांचा CM फडणवीसांना गंभीर सवाल

Published:

मागील काही दिवसांपासून सरपंच हत्या प्रकरणांमुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. आता देखील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कैलास फड नावाच्या कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याच्यावर गुन्हा दाखल करत परळी पोलिसांनी आज त्याला अटक देखील केलीय. त्याला न्यायालयाने काल 26 डिसेंबर रोजी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाय कैलास फड याच्याकडून पोलिसांनी एक परवानाधारक पिस्तूल देखील ताब्यात (Beed Crime) घेतलंय.

कैलास फड हवेत गोळीबार करत असतानाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी X अकाउंटवर पोस्ट केला होता. याच व्हिडीओच्या आधारे परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. कारवाई करत पोलिसांनी कैलास फडला (Kailas Phad) ताब्यात घेतलंय. हा व्हिडिओ जुना असून तो आता सोशल मीडियात व्हायरल होतोय. कैलास फड यांनी शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार केला होता.

Beed Crime सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलंय?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी X प्लॅटफॉर्मवर म्हटलंय की, वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत.आणि एक पिस्तुल धारी माणूस. दाउतपुर ता.परळी येथील सरपंच कांता फड आणि मुलगा कुणाल फड अवैध शस्त्र बाळगून दहशत पसरवत असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या छत्रछायेखाली? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. ही तक्रार एसपी नवनीत कावत यांना दिली. कारवाईची अपेक्षा” असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.

Beed Crime गृहमंत्र्यांना आवाहन

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृहमंत्री देवेंद्र् फडणवीस (Devendra Fadanvis) यांना देखील याप्रकरणी आवाहन केलंय. राज्यातील सर्व शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा. गरज नसलेले परवाने रद्द करा. महाराष्ट्र गुंडांचा नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. सोशल मीडियावर अशी रील दाखवल्यानंतर नवी पिढी काय प्रेरणा घेणार, असा सवाल त्यांनी केलाय. आपला देश असा असणार आहे का, असा सवाल देखील दमानिया यांनी केलाय. गरज नसलेले परवाने रद्द करा असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img