1.5 C
New York

Chandrashekhar Bawankule : CM फडणविसांना हवंय गडचिरोलीचं पालकमंत्रिपद, चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं कारण

Published:

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं देखील समोर आलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाबाबत इच्छा बोलून दाखवली. यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील. ते इतर दोन्ही पक्षांसोबत मिळून कुठे कोण पालकमंत्री असेल, याचा निर्णय (Gadchiroli Guardian Minister Post) घेतील. त्यांचा निर्णय मी मान्य करेल, बीडला पाठवलं तर बीडला जाईल. पण माझी इच्छा आहे की, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावं. जर तिन्ही नेत्यांनी मान्यता दिली, तरच मी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद माझ्याकडे ठेवीन असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

‘कोहिनूर हिऱ्यांना तू चोरून घेऊन चाललास…’रोहित पवारांची भावनिक पोस्ट

याबाबत आता महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला भरघोस यश मिळालं. जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Maharashtra Politics) घ्यावं, अशी मागणी गडचिरोलीतून होतेय. मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर तिथल्या विकासाला गती मिळते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गडचिरोलीचे मुख्यमंत्री होणार असे संकेत मिळाले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गडचिरोली चंद्रपूर या भागात प्रचंड नाश सुरू आहे. गडचिरोलीचं पालकमंत्रिपद नक्षलवाद्यांचा खात्मा करायला नको असतं. गडचिरोलीत ज्या मायनिंग कंपन्या आहेत. हजारो करोडो रूपयांचे खाण्याचे उद्योग आहेत. तिथून मलिदा मिळावा म्हणून पालकमंत्रिपद हवं असतं. हे माझं आकलन आहे. यावर कोणीही टीका करू शकतो, अशी टीका तीन-चार दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केली होती.

राज्यातील 36 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदासाठी तीव्र रस्सीखेंच सुरू असल्याच्या चर्चा आहेत. एकाच जागेवर अनेक मंत्र्यांनी दावा केल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्यामुळे पुन्हा महायुतीची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा देखील सुरू आहे. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, रायगड, नाशिक, सातारा हे जिल्हे पालकमंत्रिपदासाठी प्रतिष्ठेचे बनलेत. त्यामुळे आता पालकमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाकोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img