पुण्यामध्ये (Pune) राजगुरूनगर आणि लोणावळा येथे लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना (Sexual Assault Cases) घडली. त्यामुळे पुणेकरांमध्ये मोठी संतापाची लाट आहे. याप्रकरणी मोठं अपडेट समोर आलंय. हे दोन्ही प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे.
लोणावळा नजीक असलेल्या विसापूर किल्ला परिसरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच 5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर लगेच राजगुरूनगरमध्ये देखील दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून (Pune Crime) हत्या करण्यात आली.
याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घटनेची दखल पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतलेली आहे. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. चाकणकर म्हणाल्या की, 25 तारखेला पुण्यात घडलेल्या दोन्ही घटना या मन हेलावून टाकणाऱ्या (crime news) आहेत. राजगुरूनगरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवू. याप्रकरणी लवकरच चार्जशीट दाखल होईल. आरोपीला फाशी व्हावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाकडून करू. या घटना भयंकर असून समाजातील विकृती वाढत चालली आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
CM फडणविसांना हवंय गडचिरोलीचं पालकमंत्रिपद, चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं कारण
राजगुरूनगर प्रकरणी पोलीस अन् शासनाने चांगलं काम केलंय. आरोपी मूळ पश्चिम बंगालचा असून तो 9 वर्षांपासून तिथे राहत होता. पोलिसांनी चांगली कामगिरी करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास मृतदेह (rape case) आढळलेत. फक्त चार तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात आलीय. अनेक कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य सरकारकडून पीडित कुटूंबाला अर्थसाहाय्य दिलं जाईल, असं देखील रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
लोणावळ्यात घडलेल्या अत्याचार प्रकरणाबद्दल बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, 2 महिन्यांपू्र्वी आरोपी सचिन सस्ते पोलीस खात्यामध्ये आले होते. ख्रिसमसच्या दिवशी त्यांची गडावर नियुक्ती करण्यात आली होती. अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटूंबाचं हॉटेल आहे. आरोपीने आठ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केला होता. खात्यातून बडतर्फ करत या पोलिसाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.