-0.9 C
New York

Virat Kohli : विराट कोहलीची ‘ती’चूक चांगलीच भोवली; ICC ने दिली मोठी शिक्षा

Published:

सध्या मेलबर्नमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्याच दिवशी मैदानावर चांगलाच रोमांच पाहायला मिळाला. मेलर्बन कसोटी सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र पहिल्याच दिवशी विराट कोहली याचा ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सलामीवीर सॅम कॉन्स्टाससोबत वाद झाला आणि भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याप्रकरणी आता आयसीसीने मोठा दंड ठोठावला आहे.

सामन्याच्या पहिल्याच डावात फलंदाजी करणाऱ्या सॅम कोनस्टासला विराट कोहलीने धक्का दिला. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. हे प्रकरण मॅच रेफरीने गांभीर्याने घेतले आणि विराट कोहलीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. ही घटना जाणीवपूर्वक केल्याचं दिसून आलं. यावेळी विराट कोहलीने आपली चूक मान्य केली आणि त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीच्या या कृत्यामुळे त्याला आयसीसीने सामना फीच्या २० टक्के दंड आणि गैरवर्तनासाठी एक डिमेरिट प्वॉइंट देखील देण्यात आला आहे.

Harleen Deol : महिला क्रिकेटपटू हरलीन देओलने झळकावले शानदार शतक

तर विराट कोहलीला शिस्तीचे पालन करण्याचे देखील आदेश दिले आहेत. २४ महिन्यांच्या कालावधीत ४ डिमेरिट पॉइंट्स मिळाल्यास खेळाडूवर एक कसोटी किंवा दोन वनडे सामन्यांची बंदी घातली जाईल. असे आयसीसीचे नियम आहेत. त्यामुळे या नियमांचं पालन करणं विराट कोहलीला गरजेचं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img