‘मी राजकराणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. (Devendra Fadnavis) मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो. विद्यार्थी परिषदेत असताना कारसेवक म्हणून गेलो. त्यावेळी कारसेवक म्हणून गेलो होतो. आम्ही सगळे बदायूंच्या जेलमध्ये होतो. भाजपात काम करण्याचा निर्णय सुनील आंबेकरांनी घेतल्याचे सांगितले. तेव्हा मी मला राजकारणात काम करायचं नाही’, असे सांगितले असा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. निमित्त होतं अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी समारोहाचं.
नागपूर शहरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी समारोह व भव्य जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या जीवनातील एक जुना प्रसंग सांगितला.
कल्याणमध्ये पोलीस एक्शन मोडवर ! रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या गर्दुल्ल्यांना झोडपून काढलं
पुढे फडणवीस म्हणाले, वरिष्ठांनी आपला निर्णय घेतला की मग काम आपल्याला करायचं असतं. मला पक्षानं निवडणुकीची तयारी करा असं सांगितलं होतं. नागपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 69 मधून त्यानंतर मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली. मला पक्षाने या निवडणुकीत निवडून आणलं. नगरसेवक झालो पण कालच तो दिवस घडल्यासारखा मला वाटतोय. यानंतर मुख्यमंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो. मला मोठा पाठिंबा खरंतर स्व. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या नेत्यांचा मिळाला होता.
यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं. देवेंद्र एक अकेलाक्या करेगा असे सुळे म्हणाल्या होत्या. फडणवीस यावर उत्तर देताना म्हणाले, सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण त्यावेळी त्यांना माहित नव्हतं की मी एकटा नव्हतो. आमचे कार्यकर्ते, नेते माझ्यासोबत होते.