-0.9 C
New York

Sanjay Raut : धनंजय मुंडेंवर फडणवीस आणि अजित पवारांचा वरदहस्त; संजय राऊतांचं मोठं विधान

Published:

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे मुंडेवर देखील विरोधक तुटून पडले आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील वक्तव्य केलंय. धनंजय मुंडे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वरदहस्त असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कल्याण, अंबरनाथ हा मुख्यमंत्र्यांच्यचा चिरंजीवांचा जिल्हा आणि मतदारसंघ आहे. या जिल्ह्यात लुटमार, बलात्कार वाढले आहेत. गुंडाना अभय दिलं जातंय. खासदार मतदारसंघात फिरकत देखील नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ही घटना अक्षय शिंदे प्रकरणानंतर झालेली अतिशय धक्कादायक घटना आहे. बलात्कार, खून करणारी लोक ही बीड आणि कल्याणमध्ये का असतात? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि ते (Ajit Pawar) खासदार गप्प का? असा सवाल देखील राऊतांनी केलाय.

EVM संदर्भात सुप्रिया सुळेंनी घेतली वेगळी भूमिका; म्हणाल्या, पुराव्याशिवाय दोष…

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलणं थांबवा. तुम्हाला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद मिळाले आहे, ते विरोधकांना संपविण्यासाठी नाही तर जनतेच संरक्षण करा. लाडक्या बहिणींचं संरक्षण करा. त्या लाडक्या बहिणींच कुंकू पुसलं गेलेलं आहे, असे मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात बसलेले आहे अशी टीका देखील त्यांनी केलीय.

बीडमधील पिस्तुल लायसन्स रद्द करा, अशी मागणी देखील यावेळी संजय राऊत यांनी केलीय. 1500 लायसन्स आहेत, ते सर्व बिहार मधून आणलेले आहेत. दोन जिल्हे महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. 38 महिलांचं कुंकु त्यांनी पुसलंय. आमची माहिती सर्व तुमच्याकडे असते. तुम्ही वेशांतर करता तर मग बीडमध्ये वेशांतर करुन जा. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वरदहस्त आहे. गुन्हे खपवून घेणार नाही असं म्हणता, मग तुमचे हे जावई आहेत का? असा सवाल देखील राऊतांनी केलाय.

परळीच्या 118 बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही. बंदुकीच्या धाकावर हे मतदान होऊ दिलं नाही. अर्बन नक्षलवादाचे तुम्ही नेते आहात का? दिल्लीत झुकणारे आहेत. अर्बन नक्षलवादाचे ते कमांडर आहेत. आता मंत्र्यानी अनेक बंगले ठेवले आहे. काय लोळत काम करता का? एवढे बंगले आणि दालन कशाला लागतात? एवढं मोठं काय काय काम करतात? असं देखील राऊतांनी विचारलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img