2.3 C
New York

Heavy Rain : सावधान! उद्यापासून ‘या’ जिल्ह्यांत गारपीट अन् जोर’धार’; अवकाळीचा तडाखा बसणार?

Published:

राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. ढगाळ वातावरणाने कडाक्याची थंडी (Maharashtra Weather Update) गायब झाली असून त्याची जागा घेतली आहे. आज सर्वत्र ढगाळ हवामान दिसून येत आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) दिला आहे. राज्यात २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी दुपारपासून नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, जळगाव यांसह पुणे, नाशिक जिल्ह्यांच्या पूर्व ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात रात्रीपर्यंत वादळी पावसाचा अंदाज. काही भागात गारपिटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार? विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता राहिल. या ठिकाणी गारपीट होईल. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहिल. यानंतर रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहिल आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img