12.5 C
New York

Airtel Down : देशभरात एअरटेल ठप्प, कॉलिंग अन् इंटरनेट वापरण्यास अडचण

Published:

देशाची दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेची सेवा (Airtel Down) अचानक ठप्प झाल्याने लाखो यूजर्सना इंटरनेट (Internet) आणि कॉलिंगसाठी (Calling) अडचण येत आहे. आउटजेसचा रिव्यू घेणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरच्या म्हणण्यानुसार 3,000 हून लोकांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. सेवा ठप्प झाल्याने यूजर्सना कॉलिंग आणि इंटरनेट ऍक्सेस करण्यात समस्या येत आहेत.

माहितीनुसार, ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवांमधील आउटेजचा अहवाल देणाऱ्या डाउनडिटेक्टरनुसार, सकाळी 10:25 पर्यंत यूजर्सच्या तक्रारींची संख्या 1,900 पेक्षा जास्त झाली आहे. मात्र 10:45 च्या सुमारास तक्रारींचा आकडा 3 हजारांच्या पुढे गेला. Downdetector च्या मते, 46% लोकांना संपूर्ण ब्लॅकआउटचा सामना करावा लागला, तर 32% लोकांच्या फोनवर सिग्नल नव्हता. तर 22% लोकांना त्यांच्या फोनमध्ये नेटवर्कशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला. इंटरनेट आणि कॉलिंगसाठी अडचण येत असल्याने अनेक यूजर्स X वर तक्रार करत आहेत.

याबाबत एका यूजरने लिहिले की, “एअरटेल ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवा सर्व बंद आहेत, मोबाइल आणि ब्रॉडबँडवर नेटवर्क नाही. गुजरातमध्ये आता सर्व काही संपले आहे..!” दुसऱ्या यूजर्सने लिहिले, “#Airtel बंद आहे का? माझे वाय-फाय आणि मोबाईल दोन्ही इंटरनेटसाठी काम करणे बंद झाले आहे.” दुसऱ्या यूजर्सने लिहिले, “अरे, माझे #Airtel मोबाइल सिम इंटरनेट आणि कॉलिंगसाठी काम करणे बंद झाले आहे… नेटवर्क बंद माझे एकट्याचे आहे की सर्वांचे?…?”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img