-1.6 C
New York

Maharashtra Politics : शिंदेंच्या शिलेदाराचे गृहखात्यावर गंभीर आरोप, थेट पोलीस आयुक्तांनाच धाडलं पत्र

Published:

राज्याचे गृहमंत्रिपद सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP) यांच्याकडे आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी (Shrirang Barane) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पोलीस आयुक्तांना एक पत्र देवून तक्रार करण्यात आलीय. या पत्रात म्हटलंय की, हप्तेवसुली देखील केली जात आहे. यावर खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, एकंदरच पिंपरी चिंचवड शहरात सर्वसामान्य नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार घेवून गेल्यानंतर त्याची दखल तात्काळ घेतली जात नाही. त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्याला खूप वेळ पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं जातं. तक्रार दाखल करवून घेण्यात दिरंगाई केली जाते. त्याच दृष्टिकोनातून चोबे साहेबांना भेटून रीतसर पत्र दिलं. त्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनमध्ये असे गैरप्रकार घडतात. हे सर्रास चालू आहे. ते कुठं तरी थांबलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर मी काल पोलीस आयुक्त विनायककुमार चौबे यांना भेटून पत्र दिलंय.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांची दखल घेतली जात नाही. या अनुषंगाने पत्र दिलं आहे. एकंदरच पोलिसांचा कारभार पाहिला तर कोणाला तरी त्यामध्ये पाठीराखी करण्यासंदर्भात (Maharashtra Politics) होतोय. काही प्रमाणात ती जमिनीची प्रकरणं असतात. किंवा काही प्रकारे त्या ठिकाणी अतिक्रमण केलं जातंय. बांधकाम व्यवसायाच्या प्रकरणात पोलीस जास्त लक्ष घालतात, त्या तुलनेत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांत घालत नाही. त्यामुळे आयुक्तांनी मी स्वत: भेटून तक्रार केलीय.

खास करून काही पोलीस स्टेशनच्या बाबतीत ज्यामध्ये हिंजवडी, वाकड, काळेवाडी, सांगवी आणि अन्य मालदार पोलीस स्टेशन आहेत, त्या ठिकाणच्या तक्रारी सर्वाधिक येतात. सामान्य माणसाच्या तक्रारी घेतल्या जात नाही, या अनुषंगाने मी पोलीस आयुक्तांना भेटलो असल्याचं खासदार बारणे म्हणाले आहेत. पण ही बाब गांभीर्याने घेवून पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य माणसाला आपल्याकडून संरक्षण पाहिजे. तात्काळ त्याची दखल (Home Department) घेतली पाहिजे, या दृष्टीकोनातून भेटलो आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले फूटप्रिंट लगेच…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आहे. मागच्या सरकारमध्ये देखील अडीच वर्ष त्यांच्याकडे गृहखातं होतं. यावर बारणे म्हणाले की, काही प्रमाणात राज्याच्या प्रमुखांकडे थेट या गोष्टी पोहोचत नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधीकडे सर्वसामान्य माणूस तक्रार घेवून जातो. राज्यात महायुतीचं सरकार आलंय. एक सक्षम नेतृत्व राज्याच्या जनतेला मिळालं आहे. जनतेने मोठा विश्वास टाकलाय, त्यामुळे असे प्रकार होत असतील तर ते कुठेतरी थांबले पाहिजेत. सरकार बदनाम होता कामा नये. या दृष्टीकोनातून जनतेतील एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ही बाब गांभीर्याने पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवली.

बारणे म्हणाले की, पोलीस खात्याने कोणत्याही गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तीला मग तो सत्तेत असो किंवा सत्तेत नसो, त्याला पाठीमागे घालायला नाही पाहिजे. जी बाब योग्य आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी साथ दिली पाहिजे. सत्तेत असो किंवा सत्तेत नसो पोलिसांनी आपलं काम केलं पाहिजे. चुकीच्या कामाला पाठिंबा दिला नाही पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img