सध्या सुमारे 2 कोटी पेक्षा जास्त मराठे आता आरक्षणात गेलेत. 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. मी राहू न राहू याची परवा नाही, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. (Manoj Jarange Patil ) ते परभणीत बोलत होते. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच असं विधानही त्यांनी केलं आहे.
आता पहिलं सरकार काही लोक म्हणतात की आहे, आरक्षण देतील का?, पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असं विधान करत मनोज जरांगेंनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मनोज जरांगे हे कालपासुन परभणीत आहेत. परभणीच्या दामपुरी गावात काल रात्री ते मुक्कामी होते. गावकऱ्यांशी त्या ठिकाणी झालेल्या गाव भेट दौऱ्या दरम्यान त्यांनी संवाद साधला. ज्यामध्ये ज्यात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. तसंच, 25 जानेवारीपासून उपोषण सुरू करणार, मी राहू न राहू पण आरक्षणासाठी लढा देणार आहे असंही ते म्हणाले.
CM देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी, 12 प्रोफाईल विरोधात गुन्हा दाखल
Manoj Jarange Patil मस्साजोगला जाणार
मनोज जरांगे आज परभणी आणि मस्साजोगला जाणार आहेत. परभणीत सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मनोज जरांगे मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांचीही सांत्वनपर भेट घेणार आहेत. बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने 28 तारखेला मोर्चा ठेवलेला आहे. त्यातसुद्धा बीड जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे. तसंच कोणाचा पण बाप येऊ द्या ते मॅटर मी दबू देत नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही असंही ते म्हणाले आहेत.