-1.6 C
New York

Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर प्रचंड कोंडी, वाहनधारक वैतागले

Published:

मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने आज २५ डिसेंबर रोजी पहाटेपासूनच ख्रिसमस अर्थात नाताळ या सणाचा व सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळांच्या दिशेने मार्गस्थ झाल्याने मोठ्या (Mumbai Pune Express Way) प्रमाणात वाहतूक मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड कोंडी झाली आहे.

दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर साधारणतः लागल्या आहेत. सदरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खंडाळा बोगद्याच्या तोंडावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवत मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व सहा लेन खुल्या करत वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न महामार्ग पोलीस करत आहेत. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा गेल्या आहेत.

नाताळ सण तसेच नवीन वर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक हे लोणावळा, खंडाळा, कोल्हापूर, महाबळेश्वर, पांचगणी तसेच कोकण भागामध्ये निघाले आहेत. बहुतांश पर्यटक एक खाजगी वाहनांमधून प्रवास करत असल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटेपासूनच या वाहनांमुळे खंडाळा घाटातील अमृतांजन पूल ते अंडा पॉईंट तसेच खालापूर टोल नाका वाहनांच्या दूरवर रांगा या परिसरामध्येगेल्या आहेत. खंडाळा महामार्ग पोलीस व बोरघाट महामार्ग पोलीस हे सातत्याने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img