4.9 C
New York

Gadchiroli : जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे? मुख्यमंत्री फडणवीस की उपमुख्यमंत्री शिंदे?

Published:

गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित मोठ मोठे प्रकल्प सुरु होत असल्याने मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील मोठ्या राजकीय नेत्यांनी आता गडचिरोलीकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे समोर आले आहे. अशातच आता खाते वाटपानंतर पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी महायुतीतील तिनही पक्ष पुढे आले असून गडचिरोलीचे पालकमंत्री पद आमच्याच पक्षाकडे राहणार असल्याचा दावा स्थानिक नेते करताना दिसत आहेत.

Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर प्रचंड कोंडी, वाहनधारक वैतागले

गेल्या काही वर्षांपुर्वी गडचिरोलीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नव्हते. त्याचे कारण असे की, आदिवासीबहुल अतिदुर्गम भाग आणि त्यात नक्षलवाद्यांची गंभीर समस्या यामुळे गडचिरोलीचे पालकत्व घेण्यास नेते तयार नसायचे. मात्र, तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्वत:हून गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले होते. त्यानंतरच जिल्ह्यात नक्षलवादविरोधी आणि विकास कामांना गती मिळायला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारख्या राज्यातील मोठ्या नेत्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्विकारले होते. आता जिल्ह्यातील लोहखनिज उत्खनन आणि त्यावर आधारित प्रकल्प सुरु झाले. नक्षलवादावर अंकुश ठेवण्यात राज्य सरकारांना यश मिळाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अनेक भाषणात भविष्यात गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचा उल्लेख केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली या जिल्ह्यात अनेक मोठ्या कंपन्या मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्री पद कोणाकडे जाणार याकडेच आता सर्व राजकीय लोकांचे लक्ष लागले आहे. विशेष बाब अशी की आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कोणत्याच आमदाराला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीचे पालकत्व जाऊ शकते. राज्याच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकत्व घेतल्याची खूप कमी उदाहरण बघायला मिळतात. परंतु, गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पालकमंत्री पद स्वतःकडे ठेऊ शकतात, अशी चर्चा सध्या रंगलेली दिसत आहे

Pooja Khedkar : माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी यांना कधीही होऊ शकते अटक?

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img