फडणवीस सरकारने १२ सनदी अधिकाऱ्यांच्या (Maharashtra IAS Transfer) बदल्या केल्या असून, उद्योग विभागाच्या सचिवपदी डॉ. पी. अनबलगन तर ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या नवीन सरकार येताच करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. तर बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे.
Maharashtra IAS Transfer List : कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली.
आता उद्योग विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे .
नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांकडे .
आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली.
वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली.
राज्य कर सहआयुक्त सी वनमाथी यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
सा वनमाथी यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी.
विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ.
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी अण्णासाहेब चव्हाण पुणे विभागीय महसूल उपायुक्त यांची बदली.
सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी गोपीचंद कदम यांची नियुक्ती