1.2 C
New York

New Governor Appointments : मोठा निर्णय, 5 राज्यात नवीन राज्यपालांच्या नियुक्ती

Published:

मंगळवारी पाच राज्यांच्या राज्यपालांची (New Governor Appointments) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केली. माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मिझोरामच्या राज्यपालपदाची जबाबदारी माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांना देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, माजी लष्करप्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंह (VK Singh) यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पाच राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. यात मणिपूर, मिझोराम, केरळ, बिहार आणि ओडिसा या राज्यांचा समावेश आहे.माजी लष्कर प्रमुख जनरल विजय कुमार सिंह यांना मिझोरामच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.तर केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.

New Governor Appointments राज्यपालांच्या नवीन नियुक्त्या

अजय कुमार भल्ला : मणिपूरच्या राज्यपालपदी माजी गृहसचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. हरी बाबू कंभामपती : ओडिशाचे राज्यपाल मिझोरामचे विद्यमान राज्यपाल यांना करण्यात आले आहे.

जनरल विजय कुमार सिंग (निवृत्त): मिझोरामचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर : केरळचे राज्यपाल बिहारचे विद्यमान राज्यपाल यांना करण्यात आले आहे.

आरिफ मोहम्मद खान : बिहारच्या राज्यपालपदी केरळचे विद्यमान राज्यपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img