2.4 C
New York

Vinod Kambli : कसोटी क्रिकेटमध्ये मॅरेथॉन धावांचे द्विशतक ते दिर्घ आजारपण, कांबळींचा आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात

Published:

भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मेंदूत गाठी झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. युरिनरी इन्फेक्शन आणि क्रॅम्प्सच्या तक्रारींमुळे विनोद कांबळी यांची तब्येत खूपच बिघडल्याने सोमवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. कांबळींवर उपचार करणारे डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, वैद्यकीय चाचण्यांमधून त्यांच्या मेंदूमध्ये गाठी तयार झाल्या आहेत. कांबळी यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. ठाण्यामधील आकृती रुग्णालयाचे संचालक एस. सिंह यांनी विनोद कांबळी यांच्यावर आयुष्यभर मोफत उपचार केले जातील, अशी मोठा घोषणा केली आहे. ही बातमी पसरताच सर्वच स्थरातून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Devendra Fadanvis : ‘असं राजकारण विरोधकांना शोभत नाही’; मुख्यमंत्र्यांना विरोधकांना टोला

अलीकडच्या काही काळात आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे गेलेल्या कांबळींवर 2013 मध्ये भारतीय संघाचा आणखीन एक माजी क्रिकेटपटू व विनोद कांबलींचा लहानपणीचा मित्र सचिन तेंडुलकरच्या आर्थिक मदतीने कांबळींच्या दोन हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. कांबळी मुंबईत त्यांचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ दादरच्या शिवाजी पार्क येथे आयोजित कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात त्यांचा लहानपणीचा मित्र व आचरेकरांचा शिष्य असलेला सचिन देखील उपस्थिती होता. त्यातच माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची तब्येत बिघडत असल्याचे समोर आले होते. कांबळींची आर्थिक स्थिती बऱ्याच काळापासून ठीक नाही, तर हा माजी क्रिकेटपटू बीसीसीआयच्या 30 हजार रुपयांच्या मासिक पेन्शनवर उदरनिर्वाह करत आहे.

त्याने 1991 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले आणि 1994 पर्यंत कांबळींनी कसोटीत सलग द्विशतके झळकावली आहेत. त्यांनी मुंबईत झालेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 224 धावा, तर त्यानंतर दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध 217 धावांची मॅरेथॉन खेळी केली. 1995 मध्ये त्यांनी आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मात्र, कांबळीने वर्ष 2000 पर्यंत एकदिवसीय सामने खेळणे सुरू ठेवले होते.

Ladki Bahin Yojana : डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान

2009 मध्ये विनोद कांबळींनी निवृत्तीची घोषणा केली. तोपर्यंत ते मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत होते. मध्यंतरी त्यांनी काही सिनेमे देखील केले, तर ते काही रिअॅलिटी शोमध्येही पहायला मिळाले होते. त्यावेळी पहिल्यांदाच कांबळींनी सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या नात्यावर भाष्य केले. ते कांबळी म्हणाले की, तेंडुलकर त्यांना अधिक आधार देऊ शकला असता आणि त्याच्या बेशिस्तपणापासून तसेच नंतर होणाऱ्या अधःपतनापासून वाचवू शकला असता. परंतु, 2013 मध्ये दोन वेळा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कांबळींवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तेंडूलकरच पुढे आला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img