5.4 C
New York

Girish Mahajan : ठाकरे गटाचा मोठा पदाधिकारी महाजनांच्या भेटीला, सोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

Published:

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) आतापर्यंतचं सर्वात मोठं बहुमत मिळालं आहे. याच्या उलट राज्यातील महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव झालेला आहे. ह्या विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) 132 जागांवर विजय मिळवत महायुतीतीलच नव्हे तर राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे.

राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर व महाविकास आघाडीला पराभवाला तोंड द्यावे लागल्याने त्यांचे काही नेते आता महायुतीत जाण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shiv Sena UBT) एका मोठ्या पदाधिकाऱ्याने भाजप नेत्यांची भेट घेऊन प्रवेशाची इच्छा दाखवल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी चांगलाच जोर पकडला आहे.

Sanjay Raut : ‘फडणवीसांनी समजून घ्यावं की..; संजय राऊतांचं वक्तव्य

राज्यात पुढील पाच वर्षे महायुतीचेच सरकार राहणार .असल्याने पराभुत झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांना आता सत्तेचे डोहाळे लागले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांच्या महायुतीत जाण्याच्या हालचालींनी जोर पकडलेला दिसतोय.

अशातच नाशिकमधील (Nashik News) ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक म्हणुन ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु स्थानिक आमदार व माजी नगरसेवकांनी केलेल्या विरोधानंतर कोणाचाही प्रवेश होणार नसल्याचे प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले असल्याने ठाकरे गटाच्या त्या पदाधिकाऱ्याच्या इच्छेचं काय होणार हा प्रश्न कायमच आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img