3.1 C
New York

Devendra Fadanvis : ‘असं राजकारण विरोधकांना शोभत नाही’; मुख्यमंत्र्यांना विरोधकांना टोला

Published:

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं हत्याप्रकरणामुळे राज्याचं राजकारणं चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचे पडसाद विधीमंडळात उमटताना दिसून आले. भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी या मुद्द्याला घेऊन ‘बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद तुम्ही (देवेंद्र फडणवीस यांनी) घ्यावं’अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केली होती. यावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी माध्यमांशी संवाद साधत टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? यासंदर्भात मी (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही मिळून ठरवू. मग बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं? कोणाकडे द्यायचं? याची चर्चा करू. मात्र, बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही”.असं मुख्यमंत्री म्हणाले.

http://Ladki Bahin Yojana : डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्यसरकारवर टीका केली. यावर बोलताना, ‘बीड आणि परभणीच्या घटनेवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “बीड आणि परभणीची घटना कोणत्याही राज्याला शोभणारी नाही. अस्वस्थ करणाऱ्या या घटना आहेत. या दोन्ही घटनेत न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल? याबाबत माझ्या मनात भिती वाटते”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. या टिकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यापेक्षा सुरक्षित राज्य आहे. पण प्रत्येक घटनेचं एवढं राजकारण करणं हे विरोधकांना शोभत नाही.” असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img