3.1 C
New York

Chh. Shivaji Maharaj : अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी जागरण गोंधळ, तरीही सरकार पावले नाही

Published:

रमेश औताडे

मुंबई : अरबी समुद्रात होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक गेल्या ८ वर्षांपासून सरकारने दुर्लक्षित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आझाद मैदानात जागरण गोंधळ घालत तीव्र आंदोलन केले. तरीही सरकारला जाग आली नाही. त्यामुळे आता स्वाक्षरी मोहीम राबवत जनजागृती करत तीव्र बेमुदत आंदोलन करणार असा इशारा जय शिव संग्रामचे मुंबई अध्यक्ष शशिकांत शिरसेकर यांनी आझाद मैदानात दिला आहे.

अरबी समुद्रात श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक बांधण्यासाठी गेल्या ८ वर्षापूर्वी मोठया थाटा माटात घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात स्मारकाचे जलपूजन केले होते. आज ८ वर्ष होऊन गेली. आतापर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. देशामध्ये इतर करोडो रुपयांचे प्रकल्प तयार झाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय कोणीही घेत नाही असे सांगत सरचिटणीस मुख्य प्रवक्ते दिपक कदम म्हणाले, ९० हजार कोटींचे रस्ते होत आहेत. अटल सेतू झाला. मुंबईच्या जमिनीखालून रेल्वे धावण्यासाठी काम सुरू आहे. लाडकी बहिण लाडका भाऊ आदी योजनांच्या घोषणा होत आहेत. मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाबाबत विरोधक व सत्ताधारी शांत बसले आहेत.

Girish Mahajan : ठाकरे गटाचा मोठा पदाधिकारी महाजनांच्या भेटीला, सोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

स्वर्गीय विनायक मेटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जय शिव संग्राम संघटनेने आझाद मैदानात जागरण गोंधळ घालला. तरीही सरकार शांत आहे. आहे असे शशिकांत शिरसेकर यांनी सांगितले. यावेळी अनिल परब, आकाश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img