-4 C
New York

Vinod Kambali : विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली

Published:

काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी दिवगंत प्रशिक्षक आचरेकर सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दादरमधील शिवाजी पार्क मैदानात यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. विनोद कांबळी आणि मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर या दोघांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर विनोद कांबळी हे पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र आता माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना ठाण्यातील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विनोद कांबळी यांची प्रकृती अस्थिर झाल्याने त्यांना तात्काळ ठाण्यातील बाळकुम परिसरातील प्रगती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांची एक टीम त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे तसेच सर्वच तपासण्या केल्या जात आहेत.विनोद कांबळी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Allu Arjun : अल्लू अर्जूनच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना जामीन मंजूर; थेट मुख्यमंत्र्यांशी जोडला संबंध

किडनीशी संबंधित आजारामुळे लघवी इन्फेक्शनच्या समस्येनं क्रिकेटर त्रस्त आहे. याशिवाय ताप आणि डोकेदुखी यासारखी लक्षणंही त्याच्यात दिसून येत आहेत. शनिवारी रात्री माजी क्रिकेटरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटी स्कॅन करण्यात आले असून त्याचे रिपोर्ट्स हे संध्याकाळपर्यंत येतील. सध्याच्या घडीला त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img