-4 C
New York

Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल व अभिनेते मुश्ताक खान यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

Published:

कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांच्या अपहरण प्रकरणाची मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्यांसोबतच्या चकमकीनंतर मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिसांपासून यूपी पोलिस (UP Police) या आरोपीचा शोध घेत होते. एवढेच नाही तर त्याला पकडून देणाऱ्यासाठी पोलीसांनी बक्षीस देखील ठेवले होते.

उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये यूपी पोलिसांनी सोमवारी माहिती दिली की, कॉमेडियन सुनील पाल आणि अभिनेता मुश्ताक खान यांचे अपहरण करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या या चकमकीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी लवी पाल (Lavi Pal) याला अटक करण्यात यूपी पोलिसांना यश आले असले, तरी त्याचा साथीदार हिमांशू हा गोळीबारादरम्यान पळून गेला असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

Chhagan Bhujbal : अजित पवारांऐवजी भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, पवार नाराजी दूर करण्यात अपयशी?

बॉलिवूडसहित देशाला आश्चर्यचकीत करायला लावणाऱ्या या अपहरण प्रकरणात लवी पाल (Lavi Pal) याच्यावर 25 हजार रूपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. मुश्ताक खान यांचे 20 नोव्हेंबर आणि सुनील पाल यांचे 2 डिसेंबर रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मेरठ आणि बिजनौर (Meerut & Bijnor) पोलीसांनी गुन्हादेखील दाखल केला होता. तेव्हापासूनच लवी पाल हा फरार होता.

या अटक व एंकाऊंटर सत्राची माहिती देत पोलिसांनी सांगितले की त्यांना आरोपी आणि त्याचा साथीदार रविवारी रात्री बिजनौरच्या मांदावर भागात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीसांनी या ठिकाणी सापळा रचला होता. लवी आणि त्याचा साथीदार दिसताच क्षणी पोलीसांनी त्यांना थांबण्यास सांगितले, परंतु आरोपींनी पोलीसांवर गोळीबार केला. याला उत्तर म्हणुन पोलीसांनी देखील गोळीबार केला व त्यांच्यात चकमक सुरु झाली. या चकमकीत लवी पाल याच्या उजव्या पायाला गोळी लागली व जागीच कोसळला. या गोळीबारा दरम्यान त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. आता पुन्हा एकदा पोलीसांकडून त्याला पकडण्यासाठी निकराचे प्रयत्न केले जात आहेत.

Pune Hit and Run : पुण्यात डंपरची धडक, निष्पाप जीवांचा मृत्यू

जखमी झालेल्या लवी पालला बिजनौर पोलीसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. चकमकीदरम्यान जखमी झालेल्या लवी पालला बिजनौर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्हाला त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे यासह 35 हजार रुपये मिळाले आहेत. मेरठ आणि बिजनौर पोलीसांनी त्याच्या टोळीतील सहा जणांना यापूर्वीच अटक केली आहे. तसेच आत्तापर्यंत त्यांच्याकडून 4 लाख रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती बिजनौरचे एसपी संजीव बाजपेयी (SP Sanjiv Vajpayee) यांनी दिली आहे.

लवी पाल याच्यासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, तसेच त्याची मालमत्ता देखील जप्त करण्यात येईल, असे बिजनौरचे एसपी संजीव बाजपेयी यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img