-4 C
New York

Pune Hit and Run : पुण्यात डंपरची धडक, निष्पाप जीवांचा मृत्यू

Published:

विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराचं धोक्याचं शहर अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे. पुण्यात’ हिट अॅंड रन’ चं सत्र हे अद्याप थांबलेलं दिसत नाही. पुण्यातील वाघोली परिसरात (२२ डिसेंबरच्या) मध्यरात्री एका भरधाव वेगाने आलेल्या डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात दोन लहान बालकांचा समावेश आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याकारणाने निष्पाप नागरिकांचा जीव गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून बाकी सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ), वैभव रितेश पवार वय २ वर्ष, रीनेश नितेश पवार, वय ३० वर्ष अशी मृतांची नावे आहेत. पुणे येथील वाघोली परिसरात केसनंद फाट्याजवळ मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही घटना घडली. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काही लोक हे अमरावती वरुन पुण्यात आले होते. मजुरी करणारे कामगार रविवारी रात्री अमरावती येथून कामासाठी आले होते. या फूटपाथ वर १२ जण झोपले होते. तर बाकी फूटपाथ च्या बाजूला झोपड्यात झोपले होते. मात्र अचानक मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपाथवर गाडी टाकत फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले. ६ जण जखमी असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तिनही मृत व्यक्तींचे मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी ससूनमध्ये आणण्यात आले आहेत.

यात वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ),वैभव रितेश पवार वय २ वर्ष, रीनेश नितेश पवार, वय ३० वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर हे सर्व कामगार आहेत.जानकी दिनेश पवार,रिनिशा विनोद पवार,रोशन शशादू भोसले, नगेश निवृत्ती पवार,दर्शन संजय वैराळ आणि आलिशा विनोद पवार हे सहा जण जखमी झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img