-4 C
New York

Chhagan Bhujbal : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय चर्चा झाली?भुजबळांनी थेट सांगितलं…

Published:

महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे अनेक दिवसांपासून नाराज होते. आपल्या मनातीव खदखद त्यांनी उघडपणे माध्यमांसमोर व्यक्त केली होती. ‘जहॉं नहीं चैना, वहॉं नहीं रहना’ असं म्हणत थेट इशाराच दिला होता. लवकरच आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याचं देखीलं म्हटलं होतं. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि समीर भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा देखील झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती स्वत:छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. ‘मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर बोललो. काय काय घडलं, काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, वर्तमानपत्र आणि मीडियातून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या. जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं. त्याचाही वाटा आहे.हे आपण मान्यच करायला हवं. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होणार नाही. याची काळजी मलाही खूप आहे.’

http://Pune Hit and Run : पुण्यात डंपरची धडक, निष्पाप जीवांचा मृत्यू

‘ओबीसींचं नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. आता पाच सहा दिवस मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या आहेत. वेगळं वातावरण आहे. एक आठ दहा दिवस मला तुम्ही द्या. आठ दहा दिवसाने आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू,’असा देखील शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. तसंच ‘ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या,आठ दहा दिवस वेळ द्या,’अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. असं वक्तव्य छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img