16.7 C
New York

Nana Patole : मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभुल केली, आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार

Published:

काँग्रेस नेते व संसदेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज परभणी (Parbhani) दौऱ्यावर होते. त्यांनी परभणी प्रकरणातील पिडित सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या परिवाराची भेट घेतली व सोमनाथची हत्या ही पोलिसांनीच केल्याचे म्हणत थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप लावले. अशातच आता परभणी आणि बीड या दोन्ही घटनेच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) हे खोटे बोलले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण व परभणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची व महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली आहे, असेही पटोले यावेळी म्हणाले. पोलिसांना आणि आरोपीला वाचवण्याचे काम थेट मुख्यमंत्र्यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे म्हणत पटोले यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आम्ही हक्कभंग आणणार आहोत असे नाना पटोले म्हणाले आहेत.

Sunil Pal : कॉमेडियन सुनील पाल व अभिनेते मुश्ताक खान यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

राज्यातील ह्या दोन्ही घटना आम्ही विधानसभेमध्ये जोरदारपणे लावून धरल्या आहेत. दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या पध्दतीने खोटारडेपणा केला, तो स्पष्ट झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टचे पहिले पान महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. या रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे फडणवीस सभागृहात म्हणाले होते. यावर पटोले यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री किती खेटारडे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर नाना पटोले म्हणाले की, इथे भेट घेतल्यानंतर राहुल गांधी लोकसभेत सुद्धा भूमिका मांडून सरकारचं पितळ उघडं पाडतील असे पटोले म्हणालेत. मागासवर्गीयांना, बौद्धांना आणि अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोपही पटोले यांनी लावला आहे. या सर्व चुकीच्या गोष्टींविरुद्धचा आवाज लोकशाही पद्धतीने काँग्रेस प्रत्येक ठिकाणी उचलेल असेही पटोले म्हणाले. परभणी प्रकरणातील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस पूर्णपणे उभी असल्याचे पटोलेंनी सांगितले. ज्यांनी सोमनाथ यांची हत्या केली आहे, त्या आरोपीला सोडले जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जाणार असल्याचेही पटोलेंनी सोमनाथच्या परिवाराला आश्वासन दिले आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img