राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujal) यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते आता रोजच सार्वजनिकरित्या आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासूनच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. रोजच होत असलेल्या या नाराजीच्या चर्चेनंतर आज छगन भुजबळांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे व भुजबळ कमळ हाती घेतील का? असा प्रश्न विचरला जाच आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर लगेचच नाराज असलेल्या छगन भुजबळांनी माध्यामांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, सोबत समीर भुजबळ होते. निवडणुकीत आपल्याला महाविजय जो मिळाला आहे. त्यात ओबीसीचे पाठबळ जे लाभलं त्याबद्दल फडणवीसांनी आभार मानले. तसेच ओबीसींचे नुकसान होणार नाही. याची मला देखील खूप काळजी आहे, असे देवेंद्र फडणवीस बैठकीत म्हणाले असल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली.
Maharashtra Cabinet Minister : महायुतीचं खातेवाटप जाहीर; २ ‘ महिलांना ‘ राज्यमंत्रीपद
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. देवेंद्र फडणवीसांनी माझे सर्व ऐकून घेतले. यामध्ये मला 8 ते 10 दिवसांचा वेळ द्या… आपण 8-10 दिवसांत शांततेने मार्ग काढू, असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती छगन भुजबळांनी माध्यमांना दिली आहे. याच दरम्यान राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचे भुजबळ म्हणाले. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे अजित पवारांची भेट घेण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे की काय अजित पवार भुजबळांची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरलेत?
भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात त्यांनी सांगितले की काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यावर त्यांनी रोष व्यक्त केला. मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यासोबतच मंत्री जास्त आहेत. पूर्वी 28 मंत्री आणि बाकी राज्य मंत्री असायचे पण आता तसे नाही. त्यामुळे काहींना एकच खाते आले आहे, असेही अजित पवारांनी सांगितले. आपण आपल्या विचारावर ठाम आहोत. आपण भाजप सोबत जरी असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू, असेेेही अजित पवार म्हणाले आहेत.
Republic Day 2025 : पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ?
अजित पवारांच्या विधानांवर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, चांगली गोष्ट आहे, पण हे ठरवलं पाहिजे किती वर्ष तरुण म्हणायचे, की 67-68 पर्यंत तरुण म्हणायचं?, मी अगोदरच म्हणालो होतो, मला लोकसभेत पाठवा तिथे थांबावे लागले, राज्यसभेत थांबावे लागले, तेव्हा म्हणाले राज्यात गरज आहे. आता म्हणतात राज्यसभेत जा…म्हणजे मी विधासभेत राजीनामा द्यावा, हे कसे शक्य आहे?, असा प्रश्न छगन भुजबळांनी यावेळी उपस्थित केला. यानंतर, अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का?, या प्रश्नावर मला माहित नाही, तुम्हाला काय निष्कर्ष काय काढायचा तो काढा, असेेही छगन भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.