-4 C
New York

Allu Arjun : अल्लू अर्जूनच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना जामीन मंजूर; थेट मुख्यमंत्र्यांशी जोडला संबंध

Published:

‘पुष्पा: द रुल – भाग २’ (Pushpa 2 The Rule) फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या हैदराबाद मधील हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात अल्लू अर्जुनच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्लेप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. आज सकाळी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र आज या आरोपींना हैदराबाद न्यायालयाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

काल काही जणांनी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला केला होता. त्यानंतर यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींना हैदराबाद न्यायालयाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. काल सायंकाळी हातात फलक घेत काही लोक अल्लू अर्जुनच्या घरात घुसले. यावेळी घोषणा देत हे लोक सुरक्षा भींतीवर चढत टोमॅटो फेकू लागले. त्यानंतर सहा लोकांना अटक करण्यात आली होती.अशी माहिती हैदराबाद पश्चिम विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी दिली. याप्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी आरोपींपैकी एक हा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा सहकारी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपावर अद्यापही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याकडून कोणतेही स्पष्टता नाही आहे.

४ डिसेंबर रोजी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याचा पुष्पा: द रुल – भाग २ या चित्रपटाच्या प्रिमियर दिवशी हैदराबाद एका चित्रपटगृहात पुष्पा २ चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनही आला होता. त्याला बघण्यासाठी गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. यानंतर या प्रकरणाचे पडसाद अजूनही पाहायला मिळत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img