-8.3 C
New York

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : कौटुंबिक कार्यक्रमात ‘ ठाकरे ‘ बंधू एकत्र

Published:

मुंबईत आज सकाळपासून राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार ( sharad pawar ) यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray ) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची भेट. या भेटीची निमित्त होत ते राज ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीच्या मुलाचं लग्न. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या भाच्याचा लग्न सोहळा मुंबईत होत आहे. या निमित्ताने दोन्ही मामा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा आज पर पडला. या वेळी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे ( Raj Thackeray) या दोन्ही भावांनी कौटुंबिक विवाह सोहळ्यात संवाद साधला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात दोन्ही भाऊ एकत्र यावे हीच भावना निर्माण झाली.यावेळी त्या दोघांमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळालं.

काही दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंचं स्वागत केले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि राज ठाकरे ( Raj Thackeray) या दोन्ही भावांनी भेट थोडक्यासाठी हुकली. मात्र आजच्या या कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही भाऊ एकत्र दिसून आले. राजकीय क्षेत्रात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र यावं अशी मराठी माणसांची भावना आहे.

Maharashtra Cabinet Expansion : ठरलं तर मग ! एकनाथ शिंदेकडे गृहखातं नाहीच..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे राहून सडकून टीका करताना दिसून आले.त्यावेळी भाजपच्या विरोधात भूमिका घेत दोन्ही भावांनी रणशिंग फुंकले होते. त्यामुळे आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘ उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि राज ठाकरे ‘( Raj Thackeray ) हे दोन्ही भावंडं एकत्र येणार का ? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img