-7 C
New York

Maharashtra Cabinet Minister : महायुतीचं खातेवाटप जाहीर; २ ‘ महिलांना ‘ राज्यमंत्रीपद

Published:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ तारखेला पार पडला. त्यात ३९ मंत्र्यांची वर्णी लागली.मंत्रीमंडळ विस्तारांनंतर २१ तारखेला नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर झाले. यात अनेक नेत्यांना चांगली खाती मिळाली.राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित असलेले खातेवाटप अखेर जाहीर झाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. याशिवाय इतर नेत्यांना कोणता खात मिळालं हे आपण पाहुयात.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये भाजप सह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना कॅबिनेट मंत्रपद तर कांहीनीना राज्यमंत्री देखील मिळाले आहे. अनेक मंत्रिपदावरून तिढा कायम होती. मात्र अखेर खातेवाटप करून महायुतीचा खातेवाटपाचा तिढा हा संपलेला आहे. कॅबिनेट मंत्रिपद कोणत्या नेत्यांना मिळाली आहेत हे पाहुयात.

कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)

  • हसन मुश्रीफ – मेडिकल एज्युकेशन
  • चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
  • गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
  • गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
  • गणेश नाईक – वनमंत्री
  • दादाजी भुसे – शालेय शिक्षण
  • संजय राठोड – जलसंधारण
  • धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
  • मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
  • उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
  • जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
  • पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
  • अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
  • अशोक ऊईके – आदिवासी विकास
  • शंभुराज देसाई – पर्यटन, खनिकर्म
  • अॅड.आशिष शेलार – सांस्कृतिक कार्य आणि आयटी
  • दत्तात्रय भरणे – क्रिडा आणि अल्पसंख्याक विकास
  • आदिती तटकरे – महिला व बालविकास
  • शिवेंद्रसिंह भोसले – सार्वजनिक बांधकाम
  • अॅड.माणिकराव कोकाटे – कृषी
  • जयकुमार गोरे – ग्रामविकास
  • नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
  • संजय सावकारे – टेक्सटाईल
  • संजय शिरसाट – सामाजिक न्याय
  • प्रताप सरनाईक – परिवहन
  • भरतशेठ गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकास
  • मकरंद जाधव पाटील – मदत आणि पुनर्वसन
  • नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
  • आकाश फुंडकर – कामगार
  • बाबासाहेब पाटील – सहकार
  • प्रकाश आबीटकर – आरोग्यमंत्री

    nashik-photo-of-suhas-onions-instead-of-bhujbal-on-manikrao-koktens-banner-sparks-debate-again/

राज्यमंत्री

  • माधुरी मिसाळ – नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, मेडिकल एज्युकेशन, अल्पसंख्याक विकास
  • आशिष जयस्वाल – अर्थ, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्यायालये, कामगार
  • पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म
  • मेघना बोर्डीकर – साकोरे – आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास
  • इंद्रनील नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण
  • योगेश कदम – गृह (शहरी), महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन महायुतीच्या या नेत्यांना महत्वाची खाती मिळाली आहेत तर अनेक नेत्यांकडे असलेली खातं कडून नव्या मंत्र्यांना दिल आहे. खातेवाटप जाहीर झाले असून आता महायुतीच्या नेत्यांसमोर पालकमंत्रीच पेच हा कायम असणार असून पालकमंत्री पदाचा तिढा कसा सोडवणार हे पाहणं आता महत्वाचं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img