मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ तारखेला झाला.मंत्रिमंडळ विस्तार होऊन ७ दिवस उलटले तरी देखील खातेवाटप जाहीर न झाल्याने राज्यसरकार वर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान खातेवाटप होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित खातेवाटप अखेर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आले.
अनेक दिवसांपासून गृह खात्यावरील महायुतीत तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. गृहखात एकनाथ शिंदेंनी ( Eknath shinde ) मिळावं अशी अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. सगळ्यांची नाराजी दूर करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी ‘गृह ‘खात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्याकडे राहील हे जाहीर झालं. काल (२१ डिसेंबर) रोजी महायुती सरकारच खातेवाटप जाहीर झाले.
Border-Gavskar Trophy : जसप्रीत बुमराह पुन्हा करणार टीम इंडियाचे नेतृत्व?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन,ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. यंदा ही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना हवं असलेलं गृह खात त्यांना मिळालेलं नाही.