-8.3 C
New York

Border-Gavskar Trophy : जसप्रीत बुमराह पुन्हा करणार टीम इंडियाचे नेतृत्व?

Published:

सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. मेलबर्नमध्ये होणाऱ्या या बॉक्सिंग डे टेस्टची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ही मालिका आतापर्यंत 1-1 अशी बरोबरीत असून या सामन्यात आता दोन्ही टीम आपली पूर्ण ताकद लावण्यालाठी सज्ज झाले आहेत. याच दरम्यान भारतीय क्रिकेट प्रमींसाठी एक वाईट बातमी आली आहे. भारताचा संघ मेलबर्नमध्ये जोरदार सराव करत आहे, परंतु आता हाच त्यांच्यासाठी सराव डोकेदुखी ठरत असल्याचे समजले आहे.

मेलबर्न येथे होणाऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोन महत्वाच्या फलंदाजांच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरावा दरम्यान शनिवारी केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली, तर आज रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही सिनियर खेळाडूंच्या दुखापतींचे गांभीर्य अद्याप समोर आलेले नाही, मात्र हे दोघेही जर पुढील कसोटीतून बाहेर पडले तर त्यांची जागा कोण घेणार? आणि पुन्हा एकदा भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आता टीम इंडियाचे नेतृत्व करणार का? असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. एमसीजी येथे होणारा हा चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

उजव्या हाताचा फलंदाज केएल राहुल याच्या बदल्यात भारताकडे एकमेव पर्याय आहे तो म्हणजे अभिमन्यू ईश्वरन. केएल राहुलप्रमाणेच या उजव्या हाताच्या फलंदाजाने भारतातील क्रिकेटमध्ये सलग धावा करून सिनियर टीममध्ये आपले स्थान निर्माण केले आहे, तरीही त्याला अजुन तरी टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. ईश्वरनने खेळलेल्या आतापर्यंतच्या 101 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 48.87 च्या सरासरीने 7674 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या नावावर 27 शतके आणि 29 अर्धशतके आहेत.

कर्णधार रोहित शर्माच्या जागी खेळाडू म्हणून जास्त पर्याय आहेत. टीम मॅनेजमेंटला जर केवळ फलंदाजीच मजबूत करायची असेल तर ते ध्रुव जुरेलला ही संधी देऊ शकतात. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर हा देखील फलंदाजीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. फलंदाजीसोबतच तो गोलंदाजीतही योगदान देत आलेला आहे.

रोहित शर्मा बाहेर गेल्यास जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करु शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या मालिकेच्या पहिल्याच कसोटीत रोहित शर्मा उपलब्ध नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराहने टीम इंडियाचे यशस्वी नेतृत्व केले होते. पहिली कसोटी जी ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये खेळली गेली होती, जिथे भारतीय संघ बुमराहच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. यानंतर खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, त्यातील एका सामन्यात भारतीय संघाचा विजय, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे जसप्रीत बुमरा रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे योग्यप्रकारे नेतृत्व करु शकतो यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img