बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा हा चांगलाच चर्चेत आला. वाढती गुन्हेगारी, दहशत आणि अराजकता मुळे बीड विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय होता. सरपंच हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तडकाफडकी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांची हकालपट्टी करून बीड पोलिस अधीक्षक पदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती केली.
बीडचे नवे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत कोण आहेत याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. कोण आहेत नवे पोलिस अधीक्षक पाहुयात.नवनीत कॉवत हे २०१७ मधील बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत. कॉवत हे मूळचे राजस्थान येथील रहिवाशी असून त्यांनी आय.आय. टी मधून बीटेक पदवी घेतली आहे. बीटेक पदवी पूर्ण झाल्यानंतर खासगी कंपनीमध्ये डिझाईन इंजिनिअर म्हणून नोकरी केली. त्याचव त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली २०१७ मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि रेल्वे अधिकारी होते.
बीडमधील खंडणीच्या वाढत्या प्रकरणांमुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. अनेक व्यवसायिक आणि शेतकऱ्यांवर दबाव टाकून पैसे मागवले जात होते. यामुळे शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. सरपंचाच्या हत्येप्रकरणीही पोलीस प्रशासनाची दुर्लक्षिता दिसून आली होती, ज्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
Maharashtra Cabinet Minister : महायुतीचं खातेवाटप जाहीर; २ ‘ महिलांना ‘ राज्यमंत्रीपद
बीडमधील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अत्यंत क्रूरतेने हत्या केली गेली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आली. या हत्येने स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यात झालेल्या कमीपणाचे गंभीर प्रश्न उपस्थित केले. या हत्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले आणि न्यायाची मागणी केली. यामुळे राज्य सरकारने परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोर निर्णय घेतले.