-1.7 C
New York

Sanjay Raut: ‘मुंबई महापालिकेवर सेनेची सत्ता आणावीच लागेल’; संजय राऊतांचं वक्तव्य

Published:

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदरात अपयश आल्यानंतर आता महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या नागपुरात राज्यविधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असून दिल्लीत राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज देखील सुरु आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका सुचक विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, ‘आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान झालं होतं. पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही अशी लोकांची संख्या आहे.लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. आता आम्ही पुढे जात आहोत.महानगरपालिके मध्ये शिवसेना हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. एवढ्या कठीण परिस्थितीत आम्ही १० जागा जिंकल्या. मुंबई महापालिकेवर आम्हाला शिवसेनेची सत्ता आणावीच लागेल अन्यथा मुंबई वेगळी होईल. मराठी माणसांवर कसे हल्ले सुरु झाले आहेत तुम्ही सगळे पाहात आहातच असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई आम्ही स्वतंत्रपणे लढलो किंवा महापालिका निवडणुकी स्वतंत्रपणे लढलो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं नाही. मुंबई ओरबाडली जाते आहे ती जर आमच्या हातून गेली तर मुंबई वेगळी केली जाईल. मी हे म्हणत नाही की आम्ही स्वतंत्रपणे लढू ही कार्यकर्त्यांची भावना आहे. आमची चर्चा सुरु आहे’ असं मोठं विधान करत ठाकरेंची सेना स्वबळावर लढणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) दिले.

‘आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान झालं होतं. पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही अशी लोकांची संख्या आहे. त्यामुळे मारकडवाडीसारख्या आणि इतर अनेक ठिकाणी पुन्हा मतदान घ्या अशी मागणी केली. लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. आता आम्ही पुढे जात आहोत. महाविकास आघाडी अद्याप आहे. स्वबळावर लढण्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी असतातच. आम्ही भाजपासह होतो तेव्हा या गोष्टी झाल्याच. लोकसभेला संख्या कमी असते, विधानसभेला वाढते, आता पुन्हा या निवडणुकीच्या वेळी कमी होते. त्यामुळे स्वबळाच्या चर्चा होतात. त्यात काही विशेष नाही. निवडणुकीत जेव्हा दोन किंवा तीन पक्षांची आघाडी असते तेव्हा जागा बदलत असतात. आपल्या देशात ज्यांच्या हाती ईव्हीएम त्यांची लोकशाही असं होत असतं.’असं ही म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img