17.4 C
New York

Eknath Shinde : ‘आम्हाला शिव्या शाप देणाऱ्या लोकांना जनतेने घरी बसवलं’; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Published:

गेल्या काही दिवसांपासून उपराजधानी नागपूर येथे राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते. या अधिवेशनात बीड, परभणी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे महत्त्वाचे मुद्दे गाजले. दरम्यान आज विधीमंडळ अधिवेशाचा शेवटचा दिवस होता. यादिवशी दोन्ही सभागृहात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. सभागृहातून बाहेर पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यावळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करत, ”आम्हाला शिव्या शाप देणाऱ्या लोकांना जनतेने घरी बसवलं.”असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. तर, ‘आधीच्या सर्व योजना कायम सुरु राहणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करणार आहे. आम्ही विदर्भातील अनेक प्रकल्पांना न्याय दिलाय. सरकारच्या सर्व योजना ह्या सुरुच राहतील. विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही योग्य ती उत्तर दिली आहे.”असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

काही लोक अधिवेशनात पर्यटक म्हणून येतात, आमदारकीचा राजीनामा देतो असं म्हणाले होते मात्र अद्यापही त्यांनी राजीनामा दिलेला नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी घणाघाती टीका केली आहे. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने अजित पवार हे नाराज असतील अशा चर्चा सुरु होतील यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोजक्याच शब्दात प्रत्युत्तर देत म्हणाले,’अजित पवार बीड,परभणी दौऱ्यावर असल्याने गैरहजर आहेत.त्यामुळे अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या चालवू नका,’असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.हिवाळी अधिवेशनात १७ विधेयक मंजूर केले आहेत. लाडकी बहिण योजनेसाठी १४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सहा दिवसांत भरगोच्च कामकाज केलं आहे. विदर्भाला सव्वा तास चर्चा झाली आहे. तर नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच गती मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img